‘नवरात्रोत्सव सन्मान २०२६’ या उपक्रमात सहभागी झालेल्या नवी मुंबईतील सर्व नवरात्रोत्सव मंडळांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🙏🌺
प्रत्येक मंडळाने आपल्या देवीची सजावट, आदिशक्तीचा शृंगार, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या माध्यमातून नवी मुंबईच्या नवरात्रोत्सवाची समृद्ध परंपरा अधिक सुंदर केली आहे.
🏆 पुरस्कार मिळविणाऱ्या सर्व विजेत्या मंडळांचे विशेष अभिनंदन! 💐
आणि पुरस्कार न मिळालेल्या प्रत्येक मंडळाचेही तितकेच कौतुक — कारण या उत्सवाची खरी ताकद स्पर्धेपेक्षा सहभाग, संस्कृती, भक्ती आणि एकतेमध्ये आहे. 🙏
‘नवरात्रोत्सव सन्मान २०२६’ हा केवळ पुरस्कार सोहळा नसून, नवी मुंबईतील नवरात्रोत्सव मंडळांच्या कार्याचा, परंपरेचा, कलागुणांचा आणि सामाजिक योगदानाचा सन्मान करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.
🌺 जय अंबे जगदंबे! 🌺
✨ परंपरेतून संस्कृती, उत्सवातून एकता! ✨
— संस्कृती उत्सव नवी मुंबई

नवसाला पावणारी, वाशीची अंबेमाता.
अभिनव मित्र मंडळ, नेरुळ.
यश मच्छिंद्र करांडे - आदिशक्ती कलावंतांची – कोपरखैराणे
सौ. शैला पाटील - अध्यक्ष, श्री सेवा महिला मंडळ, सानपाडा.
उलवेची कुलस्वामिनी - आम्ही उलवेकर मित्र मंडळ
कौल आळीची आई भवानी - श्री धरती कला मंडळ, घणसोली गाव, नवी मुंबई
ऐरोलीची माय माऊली - शिवप्रेमी मित्र मंडळ
कोपरखैरणेची आईभवानी - श्री स्वराज्य प्रतिष्ठान सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
माईची माय माऊली – कोपरखैराणे
खारघरची आई - सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ
नेरुळची महाराणी - सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, नेरुळ
पॉकेटची माऊली - श्री गणेश मित्र मंडळ, नवी मुंबई
कामोठ्याची महालक्ष्मी - निर्धार सामाजिक संस्था






Copyright © 2026 “संस्कृती उत्सव नवी मुंबई” | BnBB - All Rights Reserved.
Powered by Business & Brand Builder